Accident l बोलेरो-ट्रकच्या अपघातात तीन जण जागीच ठार : चौघे गंभीर जखमी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोल्हापूर : प्रतिनिधी
देवगड-निपाणी राज्य महामार्गावर बोलेरोची ट्रकला धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच गावातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण सोळांकूर गावचे असून ऐन गणेशोत्सवात झालेल्या या अपघाताने गावात शोककळा पसरली आहे.
         याबाबत मिळालेली माहिती अशी की, राधानगरी तालुक्यातल्या सरवडे-मांगेवाडी इथं शिवमुद्रा हॉटेलजवळ रात्री साडे बारा वाजता बोलेरो गाडीने ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती
की बोलेरोचा चक्काचूर झाला आहे. अपघातात चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कोल्हापुरात उपचार केले जात आहेत.
To Top