Bhor Breaking l संतोष म्हस्के l वरंधा घाटात तीस फूट दरीत चारचाकी कोसळली : नशीब बलवत्तर म्हणून डॉक्टर बचावले

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर वरून महाडकडे वरंधा घाटातून जात असताना शिरगाव येथे वळणावर एक चारचाकी इकोस्पोर्ट गाडी साईड पट्टीवरून घसरून दरीच्या बाजूला कोसळली. नशीब बलवत्तर म्हणून गाडी मोठ्या दगडाला अडकल्याने चालक डॉ. वोवूळकर बचावले.
         सध्या घाटमाथ्यावर रिमझिम पाऊस सुरू आहे. डॉ. वोवुळकर हे पुणे वरून भोर मार्गे वरंधा घाटातून सोमवार दि.९ महाडकडे जात होते. शिरगावच्या वळणावर गाडी चालवताना चालक डॉक्टर यांचा ताबा सुटून गाडी रस्त्याच्या साईड पट्टीवरून दरीच्या बाजूला घसरली. गाडी पंचवीस ते तीस फूट दरीत कोसळून मोठ्या दगडाला अडकली. गाडीचे नुकसान झाले मात्र डॉक्टर यांना कोणतीही इजा झाली नाही. गाडी दगडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच शिरगाव ता.भोर येथील स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त गाडी दरीतून बाहेर काढण्यास मदत केली.
To Top