Baramati Breaking l चेक न वटल्याने एक महिना तुरुंगवास : १ हजार रूपये दंड व रुपये ७५ हजार नुकसान भरपाई देण्याचा आदेश

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पुजारी यांनी आरोपी नितीन महादेव कुर्ले रा. बुरूड गल्ली बारामती यांना आज दि. ५ रोजी तुरुंगवास, दंड आणि फिर्यादी यांना चेक ची रक्कम नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला. 
फिर्यादी सुनील टकले हे बारामती येथील प्रसिद्ध टेलर आहेत. आरोपी व फिर्यादी हे जुने मित्र होते. आरोपीने कोरोना काळात घरगुती आर्थिक अडचणी मुळे फिर्यादी कडून रुपये ७५ हजार हात उसने बिनव्याजी पैसे घेतले होते व त्याचा नोटरी करारनामा लिहून दिला होता. परंतु वेळेत पैशाची परतफेड आरोपी केली नाही. म्हणून फिर्यादीने तो चेक स्वतः च्या बँक खात्यावर भरला असता तो न वटता परत आला. त्यामुळे फिर्यादी यांनी अँड विशाल विजयकुमार बर्गे यांच्या मार्फत नोटीस पाठवून पुढे फौजदारी खटला बारामती कोर्टात दाखल केला होता. 
        आरोपीने असा बचाव घेतला होता की, फिर्यादी याला आरोपीने वेळोवेळी सदर रक्कम दिली होते. परंतु उभयतां मधील जुन्या एका आर्थिक व्यवहारातील एक चेक फिर्यादीने वापरुन मुद्दाम पैसे उकळण्याच्या उद्देशाने हा खोटा खटला दाखल केला आहे. फिर्यादी तर्फे अ‍ॅड विशाल बर्गे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, नोटरी बाबत तसेच चेक बाबत फिर्यादीने गैरवापर करू नये म्हणुन त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही अथवा त्याच्या बॅंकेत जाऊन चेक बाबत स्टॉप पेमेंट केले नाही. वकिलांच्या नोटिशीला तत्काळ उत्तर देऊन स्वताची बाजू मांडली नाही.  
          तसेच वकीलपत्र, नोटरी आणि चेक वरील आरोपीची सही सारखीच आहे. आरोपीने चेक वरील सही नाकारली नाही . या युक्तिवादाच्या समर्थनार्थ  सर्वोच्च न्यायालयाचे निकाल फिर्यादीचे वकील अँड विशाल बर्गे यांनी कोर्टात सादर केले. हा अँड विशाल बर्गे यांचा युक्तिवाद मान्य करून मे कोर्टाने आरोपीस तुरूंगवास, दंड तसेच फिर्यादी याला आरोपीने नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.
To Top