सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
कुडाळ ता.जावली गावचे हद्दीमध्ये सार्वजनिक रोडवर कर्ण कर्कश वाद्य /डॉल्बी वाजवण्यास मनाई असताना ए.पी.आऊटलाईन साऊंड सिस्टीम चे मालक अभिषेक रविंद्र चव्हाण रा.मु.पो. म्हसवे ता. जावली जि. सातारा, पावरप्लस साऊंड सिस्टीम चे मालक शुभम शहाजी बाकले रा.मु.पो. जुळेवाडी ता. कराड जि.सातारा, एस. आर. एस. साऊंड सिस्टीम चे मालक कृष्णा पोपट मोरे रा.मु.पो. गोडोली ता.जि. सातारा गणरायाच्या आगमन मिरवणूकीत डॉल्बी वाजविल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून गणेश मंडळांनी पारंपारिक वाद्यांचा वापर करावा असे आवाहन सपोनि पृथ्वीराज ताटे यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुडाळ येथे सार्वजनिक रोडवर संत सावता माळी मंडळ, नवज्योत मित्र मंडळ आणि पिंपळेश्वर मित्र मंडळांचे गणपती आगमन मिरवणूकी वेळी कर्ण कर्कश वाद्य /डॉल्बी वाजवण्यास मनाई असताना वाजविण्यात आल्याने ए.पी.आऊटलाईन साऊंड सिस्टीम चे मालक अभिषेक रविंद्र चव्हाण रा.मु.पो. म्हसवे ता. जावली, पावरप्लस साऊंड सिस्टीम चे मालक शुभम शहाजी बाकले रा.मु.पो. जुळेवाडी ता. कराड जि.सातारा आणि एस.आर.एस. साऊंड सिस्टीम चे मालक कृष्णा पोपट मोरे रा.मु.पो. गोडोली ता.जि. सातारा यांचेवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 36 ई अन्वये कारवाई करण्यात आली असल्याचे सपोनि पृथ्वीराज ताटे यांनी माहिती दिली.