सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भोर येथील ध्येय अभ्यासिकेतील ५ विद्यार्थ्यांनी विविध शासकीय सेवेला गवसणी घातली.
अभ्यासिकेत शासकीय सेवेचा ध्यास मनी धरून अभ्यास करीत महूडे ता.भोर येथील विजय सर्जेराव पिलांने याने एकाचवेळी नवी मुंबई पोलिस,स्टाफ सिलेक्शन कमिशन व राज्य राखीव पोलीस दल अशा तीन शासकीय पदांना गवसणी घातली,विशाल केशव साळुंके याची देखील पिंपरी चिंचवड पोलिस व राज्य राखीव पोलीस दल,तेजस तानाजी तरडे याची सातारा पोलिस,बाजारवाडीतील आकाश बबन खोपडे यांची राज्य राखीव पोलीस तर नांदच्या अनिकेत भानुदास दुधाणे जलसंपदा विभागाच्या पुणे परिमंडळात कालवा निरीक्षक पदी निवड झाली. सर्वांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे. सर्वांच्या यशामध्ये ध्येय अभ्यासिकेच्या संस्थापिका पौर्णिमा स्वप्नील जाविर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.