सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खटाव : प्रतिनिधी
सध्या राज्यांत सर्वत्र लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे, असे असताना या प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे, साताऱ्यात एकाच व्यक्तीच्या नावे तब्बल ३० वेळा अर्ज दाखल करण्यात आल्याचे समोर आलं आहे,
पोलीस तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे, या योजनेतील पैसे घेण्यासाठी महिलेने विविध पेहरावांत सेल्फी घेवुन फोटो अपलोड केला अशा प्रकारे ३० अर्ज भरले असल्याचे समोर आल्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी एस.एस खाबडे यांच्या फिर्यादीवरून वडूज पोलिसांनी निमसोड (ता. खटाव ) येथून या पती-पत्नीला अखेर ताब्यांत घेतले आहे, गणेश संजय घाडगे (वय ३० ) प्रतीक्षा पोपट जाधव (वय २२ ) अशी या दाम्पत्याची नावे आहेत, लाडकी बहीण योजनेमध्ये गैर कारभार झाल्याची तक्रार पनवेल मधील भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी २ सप्टेंबर रोजी पनवेल तहसीलदारांकडे तक्रार केली होती, खारघरमधील एका महिलेचे आधार कार्ड वापरून साताऱ्यात ३० अर्ज भरले असून यातील काही खात्यामध्ये पैसेही जमा झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे, यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने तातडीने समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावला, यामध्ये प्रतीक्षा जाधव हिने विविध पेहरावांत सेल्फी घेवुन अधिकचा लाभ मिळवण्यासाठी बेबासाइटवर फोटो अपलोड केला आणि यात माणदेशी महिला सहकारी बँकेत सदर महिलेचे पैसे जमा झाले होते, या घटनेची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी एस.एस खाबडे यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विक्रांत पाटील अधिक तपास करीत आहेत.