Bhor News l पसुरे परिसरात बिबट्याचे दर्शन : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
येसाजी कंक जलाशयाच्या पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यातील पसुरे ता.भोर येथील कुंबळजाईनगरमध्ये नागरिकांना बिबट्याचे अचानक रात्रीच्या वेळी दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
     पसुरे व आजूबाजूच्या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असून अनेक पाळीव प्राणी, जनावरे बिबट्याने फस्त केल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.अशातच बुधवार दि.४ रात्री कुंबळजाईनगर मधील रहिवाशी भरत नाथ्याबा धुमाळ यांच्या दारासमोर बिबट्या वावरत असताना दिसला.त्यांनी तात्काळ गावातील नागरिकांना तसेच सरपंच पंकज धुमाळ यांना कळविले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.वनविभागाशी संपर्क केला असून वनविभागाने तात्काळ बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा.नागरिकांनीही घाबरून न जाता सतर्क रहावे. रात्री -अपरात्री एकट्याने बाहेर न पडता समूहाने प्रवास करावा.बिबट्या पुन्हा निदर्शनास आल्यात तात्काळ संपर्क साधावा पंकज धुमाळ -विद्यमान सरपंच पसुरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
To Top