सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोरटेवाडी ता. बारामती येथे गावातील विद्युत खांबावरील बल्ब बसवताना विजेचा शॉक लागल्याने खांबावरून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
विकास चंद्रकांत कांबळे वय ३२ होळ गावठाण ता. बारामती असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. विकास हा परिसरात विजेची विविध कामे करतो. आज सकाळी सोरटेवाडी ग्रामपंचायतचे विद्युत खांबावरील लाईट चे बल्ब बसवत असताना सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान खांबावरून खाली पडला. यामध्ये त्याचा डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्च्यात आई, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.