पुरंदर l निरेत नोकरी महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद : समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन आणिनिर्माण ऑर्गनायझेशनचा संयुक्त उपक्रम

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन निरा (पुरंदर) आणि निर्माण ऑर्गनायझेशन,हडपसर (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर तालुक्यातील निरा-शिवतक्रार येथे नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या नोकरी महोत्सवातून १०० हून अधिक युवक युवतींनी ऑनलाईन नोंदणी केली होती. अनेक युवक युवतींनी या महोत्सवात सहभाग नोंदवला.
       तब्बल ७० जणांनी या मेळाव्यात प्रत्यक्ष सहभागी होत मुलाखत दिली. ३० ते ३५ जणांच्या मुलाखती विविध ठिकाणी नोकरी मिळविण्यास पात्र ठरलेल्या आहेत.त्यामुळे युवक युवतींना नोकऱ्या उपलब्ध करून देणाऱ्या समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन आणि निर्माण ऑर्गनायझेशनचे विशेष कौतुक करण्यात येऊ लागले आहे.महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी या आयोजना बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर सुध्दा विशेष कौतुक केले.
         समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनचे राहुल मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निरा शिवतक्रार ग्रामपंचायत कार्यालय येथे हा नोकरी महोत्सव संपन्न होत असताना समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनम मोरे,उपाध्यक्षा मंगल मोरे,सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे व इतर उपस्थित होते.निर्माण ऑर्गनायझेंशनचे मॅनेजर सौरभ काकडे,मॅनेजर सचिन सर,ट्रेनर स्नेहल माने,ट्रेनर आशिष हिवाळे आदींनी मुलाखत घेण्यासाठी विशेष मेहनत घेतली.मुलाखती साठी आलेल्या युवक युवतींशी सुसंवाद साधून त्यांच्यातील आत्मविश्वास त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण माहीती गोळा करण्यात आलेली असून प्रत्येकाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकरी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आलेले आहे.आय टी,आयटीआय,इंजिनिअरिंग,
ग्रॅज्युएशन,बारावी आदी शिक्षण घेतलेल्या युवक युवतींनी या नोकरी महोत्सवात हजेरी लावली.
७ ते ८ मुले मुली आय टी ,४ ते ५ मुले आयटीआय
, ७ ते ८ मुले मुली ग्रॅज्युएशन,१५ मुले मुली १२ वी यासारख्या विविध शैक्षणिक क्षेत्रातून आलेल्यांना रोजगाराची उपलब्धता असल्याचे सांगण्यात आलेले आहे.समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन आणि निर्माण ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून युवक युवतींना नोकरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने दोन्ही संस्थाबद्दल विशेष समाधान व्यक्त करण्यात आले.निरे सारख्या शहरात राहुल मोरे आणि सोनम मोरे यांनी युवक युवतींच्या हिताच्या दृष्टीने या नोकरी महोत्सवाचे आयोजन केल्याने अनेकांना यातूनच नव्या संधी उपलब्ध होणाऱ्या आहेत.विशेष म्हणजे मुलाखत देणाऱ्यांनी सुद्धा या नोकरी महोत्सवाकडे सकारात्मकतेने पाहत चांगला प्रतिसाद दिला.आम्हाला युवक युवतींकरिता नोकऱ्या उपलब्ध करून देता आल्याने यापुढे ही अजून चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळत आहे.समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य करीत राहील.असा विश्वासच राहुल मोरे आणि सोनम मोरे यांनी व्यक्त केलेला आहे.निर्माण ऑर्गनायझेशन हे १८ ते ३० वर्षे वयोगटातील मुलींना विविध कौशल्यांचे ९० दिवसांचे  प्रशिक्षण शिबिर तसेच नोकरी सुद्धा मिळवुन देत असते.या वर्षभरात १० ते १२ नोकरी मेळावे घेण्यात आलेले आहेत.४०० मुलीं पर्यंत नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
असे निर्माण ऑर्गनायझेशनचे मॅनेजर सौरभ काकडे यांनी सांगितले.समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनच्या विशेष सहकार्याने निरेसारख्या ठिकाणी हा नोकरी महोत्सवात घेता आल्याने  निर्माण ऑर्गनायझेशनने समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनचे विशेष आभार मानलेले आहेत. यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती दत्ता चव्हाण, उपसरपंच राजेश काकडे, सदस्य अनिल चव्हाण, अमोल साबळे ,आपचे महेश जेधे, विजय धायगुडे, वैभव कोंडे, अनेक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते
To Top