सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
कुतवळवाडी सोसायटीचे सचिव यांना तातडीने कामकाजातून दूर करावे, वेतानापोटी घेतलेली रक्कम संस्थेस परत करावी तसेच संजय झगडे व अभिजित झगडे यांच्यावर फसवणूक बाबत गुन्हे दाखल करावेत या सभासदाच्या मागणीवर बारामतीचे सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे यांनी बारामती तालुका देखरेख संघाला योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत.
याबाबत संस्थेचे सभासद जालिंदर सुभाष कुतवळ यांनी दि. ३ सप्टेंबर रोजी बारामतीचे सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी केलेल्या तक्रारीत म्हणटले आहे की, राजमाता जिजाऊ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कुतवळवाडी ता. बारामती जि पुणे या संस्थेवर आभीजीत काळखैरे हे मागील ६ वर्ष कामकाज पाहत आहेत. मागील वर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये संचालक मंडळाने संजय झगडे यांची सचिव म्हणून बारामती देखरेख संघ यांचे माध्यमातून नियुक्ती करून घेतली आहे. सबंधीत सचिव हे संस्था कार्यालयात बसले नाहीत व काहीही काम करीत नाहीत. कार्यालयात उपस्थीत न राहता सहसचिव यांना पुढे करून सभासदांना सामोरे न जाता विनाकारण अडवणूक करीत आहेत.
१. संस्थेच्या कामकाजातून संजय झगडे व त्यांचे चिरंजीव आभीजीत झगडे यांना तातडीने संस्थेच्या कामकाजातून दुर करावे. २. संजय झगडे यांच्या वेतनापोटी केडर यांनी घेतलेली वर्गनी ते काम करत असलेल्या संस्थेस आकारणी करून फरक रक्कम राजमाता जिजाऊ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कुतवळवाडी संस्थेस रक्कम परत करावी. ३. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाची फसवणूक केलेबद्दल संजय झगडे व त्यांचे चिरंजीव आभीजीत झगडे यांचे वर गुन्हा दाखल करावा.
याबाबत सहाय्यक निबंधक यांनी तालुका देखरेख संघाला सूचना दिल्या आहेत. त्यांनी म्हणटले आहे की, अर्जदार यांनी सादर केलेल्या मुददा क्रं १ ते ३ बाबत नमुद करणेत येते की, सदरचे कर्मचारी हे आपले सनियंत्रणाखाली व आस्थापनेवर असल्याने त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अर्जदारास देवून तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.