सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
स्वतच्या मुलाची बोगस कागदप्रांद्वारे सहसचिव म्हणून नियुक्तीचे प्रकरण ताजे असतानाच राजमाता जिजाऊ सोसायटी कुतवळवाडीच्या सचिवाचा अजून एक प्रताप समोर आला आहे. याबाबत संस्थेचे सभासद जालिंदर कुतवळ यांनी गंभीर आरोप केले आहेत.
जालिंदर सुभाष कुतवळ यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटणले आहे की, संजय झगडे सद्या राजमाता जिजाऊ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कुतवळवाडी येथे सचिव म्हणून कार्यरत असून याही संस्थेवर गरज नसताना स्वतच्या मुलाला क्लार्क म्हणून
घेतले आहे. ही बाब सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बारामती यांजकडे दिनांक ३ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दाखल झाली असता व संबधित सचिव यांचे बाबुर्डी संस्थेतील
बोगस कारनामा चे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झालेमुळे संबंधित विषय वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चेला येऊ शकतो व आपली अडचण होऊ शकते हे ओळखून संबंधित सचिव यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा न घेता फक्त कागदोपत्री सर्व पूर्तता दाखवली आहे. तसेच संचालक मंडळ
व त्यांचे जवळील मोजकेच केवळ १४ ते १५ सभासद हजर असताना ५६ लोकांच्या सह्या
घेऊन सभा झाली असे दाखवले आहे.
वास्तविक कोणत्याही सहकारी संस्थेची वार्षिक
सर्वसाधारण सभाची १५ दिवस आधी पूर्वसूचना प्रत्येक सभासदास देणे गरजेचे असताना ती दिली गेली नाही.
संस्थेचे एक हजारच्या पेक्षा जास्त सभासद असताना एकाही सभासदास नोटीस देणेत आली नाही. आपले काळे कृत्य लपविण्यासाठी संचालक मंडळास हाताशी धरून प्रत्यक्षात सभा न घेता केवळ कागदोपत्री बोगस सभा दाखवून श्री झगडे यांनी संस्थेच्या सभासदांची फसवणुक केली असून सदर सचिव यांजकडून संस्थेचा कारभार तातडीने काढून घ्यावी व वार्षिक सर्वसाधारण सभा न
घेतल्याबद्दल संचालक मंडळावर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी जालिंदर कुतवळ यांनी केली आहे.
सचिव संजय झगडे यांनी स्वतःच्या मुलाची बोगस ऑर्डर काढण्यासाठी जो प्रस्ताव दाखल केला होता त्या प्रस्तावाची सर्व कार्याल्यांतील सर्व कागदपत्रे गहाळ अथवा नष्ट होण्याचा कट शिजत असून संजय झगडे यांना पाठीशी घालून सहकार खात्यातील अधिकारी सहकाराचा नक्की कोणता अर्थ साधत अहित असा प्रश्न जालिंदर कुतवळ यांनी केला आहे.
COMMENTS