सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बाबुर्डी गावच्या पोलिस पाटील वनिता राजकुमार लव्हे यांचे पती राजकुमार किसन लव्हे यांच्यामुळे समाजातील लोकांना नाहक त्रास देत आहे. यामुळे बाबुर्डी ग्रामस्थांनी याची थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे तक्रार केली आहे.
ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांना दिलेल्या तक्रारी अर्जात म्हणटले आहे की, आमचे गावचे पोलिस पाटील वनिता राजकुमार लव्हे या महिला असून त्यांचे पती राजकुमार लव्हे हे पोलिसांचे पंटर म्हणून काम करतात. गावातील गरीब धनगर समाजाला त्रास देणे, भांडणे लावणे, पोलिसात तक्रार करायला लावणे व तक्रार मिटवण्याच्या नावाखाली पैसे उकळणे असा धंदा करतात. शेत मंजूरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या पतीना पोलिस स्टेशनला नेऊन त्यांच्या कडून पैसे उकळतात, तुमचा कार्यकर्ता असल्याचे सांगून गावात हवा करतात. व गोरगरिबांना लुटतात. फोन रेकॉर्डिंग करणे, ब्लॅकमेल करून पैसे उकळणे असे त्याचे उद्योग आहेत. शेरेवाडी बाबुडींतील सर्व लोक तुम्हाला माननारेच आहेत परंतु या व्यक्तिमुळे त्याचा वागण्यामुळे सर्वजन वैतागलेले आहेत. आपल्या पक्षाच्या हितासाठी याला आवरणे गरजेचे आहे. तसेच त्याचा पत्नीचे पोलिस पाटील पद रद्द करणे गरजेचे आहे. आम्ही सर्वजन आपले प्रामाणिक कार्यकर्ते असून वरील सत्य आपणा पर्यन्त सांगत आहोत. गरीब लोक भीती पोटी बोलत नाहीत पण हे सर्व अति होत असल्याने आम्ही आपणास कळवित आहोत.
राजकुमार लव्हे याने संजय प्रभाकर झगडे यांचेकडून १ लाख रुपये घेतले आहेत तो अश्या प्रकारे पैसे उकळलेले आहेत. रस्त्यावर उभे राहून माती मुरमाच्या गाड्या अडवतो पैसे गोळा करतो व शेतकऱ्यांची करतो. असे तक्रारी अर्जात म्हणटले आहे.