Bhor News l संतोष म्हस्के l दवाखाने हाऊसफुल्ल.. प्रशासन कुल..! साथीने आजाराने भोरकर बेजार

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसांपासून भोर तालुक्यात हवामान बदलामुळे दूषित वातावरण तयार झाले असल्याने अबाल- वृद्ध खोकला थंडी-तापाने त्रस्त झाले आहेत. दरम्यान खाजगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची उपचारांसाठी गर्दी होत आहे.
            तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात पावसामुळे साठून राहिलेले पाणी ,गवताचे साम्राज्य, तुंबलेली गटारे यामुळे मच्छर मोठ्या प्रमाणावर झाले आहेत.याचा नाहक त्रास गावांमधील नागरिकांना होत असल्याने रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.शहरात तसेच ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपाय योजना आखून गटारे स्वच्छ करुन सार्वजनिक परिसर साफ करावा.तर औषध फवारणी केल्यास तात्काळ वाढणारे मच्छर कमी होतील तर रोगराई तात्काळ आटोक्यात येण्यास मदत होईल असे त्रस्त नागरिकांकडून बोलले जात आहे. तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये अद्याप औषध फवारणी केलेली नसल्याने डास उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे.सद्या रुग्णालयांमध्ये अबाल-वृद्ध उपचारासाठी दाखल होत आहेत.गावात स्वच्छता मोहीम राबवून डास उत्पत्ती रोखण्यासाठी गाव पातळीवर विशेष मोहीम राबवावी असेही नागरिकांनी सांगितले गेले.
-----------------------
रोगराई निमंत्रण नियंत्रणात ठेवण्यासाठी गाव कारभाऱ्यांना सूचना
सध्या तालुक्यात हवामान दूषित असल्याने व गटरांवर डास उत्पत्ती होत असल्यामुळे रोगराई वाढत असल्याचे समोर येत आहे.या पार्श्वभूमीवर रोगराई नियंत्रणात आणण्यासाठी गाव कारभाऱ्यांना तात्काळ धूर फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. याचे काम बहुतांशी गावांमध्ये सुरू आहे. असे भोर पंचायत समिती गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी सांगितले.
                                     
To Top