Bhor News l स्थानिक लोकप्रतिनिधींची कित्येक वर्ष सत्ता : मात्र दिव्यांग बांधवांची साधी विचारपूस नाही : बाळासाहेब चांदेरे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर, राजगड (वेल्हा), मुळशी तालुक्यातील हजारो दिव्यांग व्यक्ती विविध योजनांपासून अनेक वर्ष दूर राहिलेल्या आहेत.महायुती शासनाच्या माध्यमातून  दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ तात्काळ मिळवून देणार असून पुढील काळात दिव्यांगांच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना ( शिंदे गट) जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी केले.
      भोर येथे दिव्यांग बांधव मेळावा बाळासाहेब चांदेरे युवा मंच भोर ,राजगड (वेल्हा ),मुळशी तसेच दिव्यांग संघटना यांनी रविवार दि.१५ आयोजित केला होता. यावेळी बाळासाहेब चांदेरे बोलत होते.यावेळी दिव्यांग बांधवांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला.लकी ड्रॉ मध्ये ५० दिव्यांगांच्या चिठ्ठ्या काढून बक्षिसे देण्यात आली.तर मेळाव्यासाठी उपस्थित राहणाऱ्या दिव्यांगांना आकर्षक भेटवस्तू दिली गेली. कार्यक्रमप्रसंगी शिवव्याख्याते गुलाबराव वळसे पाटील, महिला जिल्हाप्रमुख कांताताई पांढरे,उपजिल्हा प्रमुख गणेश निगडे,भोर तालुका प्रहार अपंग संघटना अध्यक्ष बापू कुडले,भोर विधानसभा प्रमुख गणेश मसुरकर, तालुका प्रमुख दशरथ जाधव,शिवाजी भेगडे,(मुळशी),नामदेव वालगुडे( वेल्हा ),शबिना शेख (खंडाळा),प्रशांत रानवडे,सरपंच सचिन मरगळ,भानुदास दुधाने आदींसह हजारो दिव्यांग बांधव उपस्थित होते.
      चांदरे पुढे म्हणाले स्थानिक लोकप्रतिनिधींनी कित्येक वर्ष सत्ता असतानाही दिव्यांग बांधवांची साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही.पुढील येणाऱ्या काळात भोर ,राजगड (वेल्हा), मुळशी तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडून दोन एकर जागा मिळवून त्या ठिकाणी दिव्यांगांसाठी प्रशस्त हॉल उभारण्यात येईल.
------------------------
५०० लोकांचे नियोजन हजार जमले
 दिव्यांग बांधवांच्या मेळाव्यासाठी आयोजकांकडून पाचशे लोकांचे कार्यक्रमस्थळी बैठक व्यवस्था तसेच जेवनाची व्यवस्था केली गेली होती .मात्र एक हजारहून अधिक भोर, राजगड( वेल्हा ),मुळशी तालुक्यातून दिव्यांग व्यक्ती मेळाव्यासाठी उपस्थित राहिल्याने काही वेळ आयोजकांची तारांबळ उडाली.
To Top