Bhor News l धरणाच्या कडेला चारचाकी लावली : बायकोला फोन केला आणि निरा-देवघर धरणाच्या पाण्यात आपले आयुष्य संपवले

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर-महाड मार्गावरील हिरडस मावळातील नीरा-देवघर धरणाच्या पाण्यात पुणे धनकवडी येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. श्रीकांत विलास देशमुख वय - ४४ (रा.धनकवडी- पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून रविवारी दि.१५ सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.घटनेची माहिती मिळताच तात्काळ  भोर पोलिसांनी घटनास्थळ शोधून संबंधीत व्यक्तीचा मृतदेह नीरा-देवघर धरणाच्या पाण्याबाहेर काढला.
      याबाबत भोर पोलिसांनी दिलेली माहितीनुसार रविवार सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांना ११२ क्रमांकावर कॉल आला.एक व्यक्ती वरंधा घाटातील वारवंड ता.भोर गावच्या जवळ आत्महत्या केली आहे. पोलिसांनी खातरजमा केली असता संबंधीत व्यक्ती श्रीकांत देशमुख असून तो आपली मारुती मोटार वॅग्नर (क्रमांक एम एच १२ आर वाय ४२८६) घेवून वरंधा घाटातील वारवंड येथे आला. घाटात आल्यावर त्याने पत्नीला फोन करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते.पोलिसांना वरंधा घाटातील वारवंड गावच्या हद्दीत रस्त्याच्या क़डेला मोटार उभी दिसली परंतु त्यामध्ये कोणीही नव्हते.त्यांनी त्यापुढे पाच-सहा किलोमीटर अंतराचा परिसर पिंजून काढला.अखेर दोन तासांनी त्यांना नवलाई पूल परिसरात निरा-देवघर धरणाच्या पाण्यातून श्रीकांत देशमुख यांचा मृतदेह बाहेर काढला.दरम्यान रात्री उशीरापर्यत भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत.
To Top