सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे मागील चार वर्षांपासूनचे आरटीई पर्तिपुर्ती शुल्काचे २०० कोटी परतावा शुल्क थकीत आहे.त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील सुमारे २५ हजार शिक्षक व शिक्षकतेर कर्मचारी अडचणीत आले आहेत. जिल्हा परिषदेच्या जाचक अटी व लालफितीच्या कारभारामुळे अडचणी निर्माण होत आहेत. विनाअट ३० सप्टेंबर पर्यंत थकीत पर्तिपुर्ती लवकर देणेत यावी अन्यथा जिल्हा परिषदेवर विद्यार्थ्यी शिक्षकांसह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) संघटनेने दिला आहे.
कोऱ्हाळे ता. बारामती याठिकाणी संघटनेची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश सांगळे, उपाध्यक्ष दत्तात्रेय माळशिकारे, संघटक संग्राम मोकाशी, बारामती अध्यक्ष विनोद जगताप, उपाध्यक्ष महादेव काळे,हनुमंत एजगर
भोर तालुकाध्यक्ष दत्तात्रेय साळवी,व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उच्च न्यायालयातही तातडीने याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थाचालकांचे शिष्टमंडळ लवकरच याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार आहेत. जिल्हात इंग्रजी माध्यमाच्या सुमारे ९०० शाळा ह्या शालेय फी व आरटीई परतावा यावरच अवलंबून असतात मात्र इतर जिल्हात परतावा शुल्क विनाविलंब मिळत असताना पुणे जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडुन विलंब केला जात आहे यासाठी जाचक अटी व नियम केले जात आहेत जिल्ह्यातील चार वर्षांचे सुमारे २०० कोटी रूपये थकल्याने शाळांबरोबरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे पगार अडचणीत आले आहेत. शाळांनी प्रवेश प्रकियेत नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली मात्र शासनाकडे पाठपुरावा करुनहीनाहक त्रास दिला जात आहे असा आरोप करण्यात येत आहे.