Bhor News l टिटेघरच्या रामेश्वर मंडळाची पर्यावरणपुरक सजावट : एक हजार द्रोण व नऊशे पत्रावळ्यांचा सजावटीसाठी उपयोग

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबवडे खोऱ्यातील शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायरेश्वर किल्याच्या पायथ्याशी वसलेल्या टिटेघर ता.भोर येथील रामेश्वर सेवा व क्रिडा मंडळाने गणेशोत्सवानिमित्त यंदा सजावट म्हणून वडाचे पानांनी बनवलेल्या द्रोण पत्रावळ्यांचा वापर करुन भव्य दिव्य अशी पर्यावरण पूरक सजावट केली असल्याने तालुक्यात सर्वत्र या सजावटीची चर्चा सुरू आहे.
     मंडळाच्या गणेश भक्तांनी सजावटिसाठी १००० द्रोण व ९०० पत्रावळीच्या साह्याने ही सुंदर सजावट केली असल्याने आंबवडे खोऱ्यातील गणेशभक्तांचे अकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. परिसरातील बहुतांशी गणेशभक्तांनी टिटेघर येथे भेट देवून सजावटिचे अकर्षणाचा व वेगळेपनाचा अनुभव घेतला.दरवर्षी नाविन्यपूर्ण  ऊपक्रम राबवण्याचा पांयंडा रामेश्वर सेवा व क्रिडा मंडळाने गेली ३५ वर्षे जोपासलेली आहे.गणेश मुर्तीवर राजेंद्र वाडकर यांनी  केलेले सुंदर डायमंड वर्क अनेक गणेशभक्तांना भावले .मंडळाचे संस्थापक शंकर तुकाराम सणस.अध्यक्ष  दत्तात्रेय लक्ष्मण सणस,उपाध्यक्ष  संतोष जगन्नाथ नवघणे यांचे नेत्रुत्वात मंडळ एका चांगल्या दिशेने मार्गाक्रमण करत असल्याची ग्वाही अनेक गणेशभक्तांनी दिली.मंडळानी व कार्यकर्त्यांनी केलेला हा नाविन्यपुर्ण ऊपक्रम म्हणजे विज्ञानाचा ऊत्तम अविष्कार साधून पर्यावरण हित जोपसण्याचे  ऊदाहरण असल्याची चर्चा पंचक्रोशित आहे.
To Top