सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
समाजकल्याण कार्यालय,जिल्हा परिषद सातारा, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र सातारा जिल्हा आणि राजा शिवछत्रपती संस्कृतिक मंडळ करंजे यांच्या संयुक्त विद्यमाने,गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी
सायं ६.३० ते ८. ३० या दरम्यान पोस्टर प्रदर्शन व नशाबंदी संकल्प शपथ कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमासाठी सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्याक्ष व सध्याचे नगरसेवक मा.मनोज शेंडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भुजबळ,मंडळाचे अध्यक्ष प्रज्योत पाटील, कार्याध्यक्ष नितीन शिंदे व जिल्हा संघटक प्रा.मंगला साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस नशाबंदी मंडळ व प्रहार यांच्या सुमारे ४० पोस्टर्सच्या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यानंतर श्रीगणेशाची आरती झाल्यावर,उपस्थित भक्तगण व प्रमुख पाहुण्यांनी गणेशा समोर सर्वांनी " व्यसनमुक्ती संकल्प " शपथ घेण्यात आली. या संकल्प शपथीचे वाचन नशाबंदी मंडळ समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा.आनंद साठे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी,प्रज्योत पाटील, निखिल इंदलकर,अमोल इंदलकर, ओमकार पांडेकर,निलेश इंदलकर, निलेश इंदलकर, संकेत बोराटे व मंडळाच्या सर्व सदस्यांनी खूपच परिश्रम घेतले.या कार्यक्रमात सुमारे १२५ जणांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला.शेवटी नितीन शिंदे यांनी आभार मानले.
COMMENTS