सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, व ऑल अबाऊट बिझनेस नीरा,यांच्या संयुक्त विद्यमाने निरा व परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत निरा येथील सभागृहात करण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी ऑल अबाऊट बिझनेस चे प्रमुख मंगेश ढमाळ यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
निरा व परिसरातील नव उद्योजक, महिला, नागरिकांनी सदर शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवला व कार्यक्रमाचे कौतुक देखील केले, या शिबिरास श्री एस आर खरात जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ पुणे. यांनी मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम,(PMEGP )मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम,(CMEGP )कौशल्य सन्मान योजना(विश्वकर्मा )व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या मध केंद्र योजनेबाबत मार्गदर्शन केले, निरा परिसरातील सुशिक्षित तरुण बेरोजगार महिला उद्योजकांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार उभा करावा असे आवाहन श्री खरात यांनी केले, या प्रसंगी श्री एस एन खंदारे उद्योग निरीक्षक यांनी मध केंद्र योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास तरुण सुशिक्षित बेरोजगार उद्योजकांनी भरपूर प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुंभार समाजाचे अध्यक्ष शमराजे कुंभार,निरेचे उपसरपंच राजेश काकडे,स्वप्नील बडबडे,अभिजित वाडेकर,जगन्नाथ धायगुडे,तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निरा शाखेचे अधिकारी, IDBI बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
COMMENTS