सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
नीरा डाव्या कालव्यावरील ज्योतिर्लिंग सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित गुळूंचे या संस्थेच्या १५ एचपी च्या दोन व २५ एचपी ची एक मोटर चोरी करण्याचा प्रयत्न काल रात्री घडला.
ज्योतिर्लिंग पाणीपुरवठा संस्थेमार्फत गुळूंचे भागातील शेकडो एकर क्षेत्र डाव्या कालव्यावरील ज्योतिर्लिंग सहकारी पाणीपुरवठा संस्थेमार्फत ओलिताखाली आले आहे यामुळे या भागातील शेतकरी उसासारख्या नगदी पिकाकडे वळलेला दिसत आहे परंतु काल मध्यरात्री बारा ते तीन च्या दरम्यान या पाणीपुरवठा संस्थेच्या इंजिन घरातील दरवाजाची कुलुपे तोडून आतील १५ एचपी च्या दोन व २५ एचपी चे एक अशा तीन मोटर चोरी करण्याचा प्रयत्न झाला मोटर पूर्ण खोलून झाल्यानंतर त्या उचलल्या न गेल्यामुळे त्या मोटर त्यांनी तिथेच भरावावर सोडून दिल्या या चोरांच्या चपला देखील भरावावर पडलेल्या दिसत आहेत मोटर नेण्यासाठी त्यांनी मोठ्या वाहनाचा (ट्रॅक्टर) चा वापर देखील केलेला दिसत आहे भरावावरती टायरचे व्रण स्पष्ट दिसत आहेत सकाळी मोटर चालू करण्यास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मागील पंधरा दिवसात याच भागातून दोन डीपी देखील चोरीला गेले आहेत त्याचा तपास देखील अद्याप चालू असताना हा प्रकार घडल्यामुळे शेतकरी देखील हवालदील झाला आहे. मोटर खोलल्यानंतर त्या उचलल्या न गेल्यामुळे या शेतकऱ्याचे होणारे नुकसान तळले आहे परंतु हाच प्रकार पुन्हा घडण्याची देखील शक्यता शेतकऱ्याकडून वर्तवण्यात येत आहे.
COMMENTS