सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
मी ही दहा वाजेपर्यंत झोपी शकतो. पण मी कामाचा माणूस आहे मी जे बोलतो ते करूनच दाखवतो. काही जण मात्र फक्त निवडणुकीपुरते येतील मात्र तालुक्याचा विकास असाच चालू ठेवायचा असेल तर आपल्या विचारांचा आमदार निवडून असे आवाहन अजित पवार यांनी केले.
होळ ता. बारामती येथील बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले की राज्यातील बहिणींना सक्षम करायचे आहे. शेतकऱ्यांना आधार द्यायचा आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपये सरकार खर्च करत आहे. मात्र या योजना भविष्यातही चालू ठेवायच्या असतील तर महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे. मी फक्त विनंती करू शकतो. मत कुणाला द्यायचे तो अधिकार तुम्हाला आहे.
गेली अनेक वर्षे आपण सरकारमधे होतो मात्र या टर्म मधे सर्वात जास्त विकासकामे करू शकलो याचा आनंद आहे. बारामती तालुक्यात अनेक योजना राबवता आल्या. आठ हजार कोटींची कामे करता आली.
मी सेक्युलर माणूस आहे. सर्व धर्मांना सोबत ठेवून आपण विकास करत आहोत. अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये दिले आहेत. घटनेला कुणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर मी शांत बसेन का हे तुमचेच सरकार आहे. समाजातील कुठलाही घटक वंचित राहणार नाही याची आपण काळजी घेत आहोत. केंद्रातील सरकार आपल्या विचाराचे आहे तेव्हा बारामतीचा आमदार ही आपल्या विचाराचा निवडून येईल यासाठी सर्वांनी झटून काम करा असा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी युवा नेते जय पवार, पक्ष निरीक्षक सुरेश पालवे, संभाजी होळकर, पुरुषोत्तम जगताप, किरण गुजर, विश्वास देवकाते, विक्रम भोसले, पोपट गावडे, सतीश काकडे, राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, नानासाहेब मदने, सचिन सातव उपस्थित होते.
-----------
निदान माझ्यासाठी तरी गटतट विसरा- अजितदादा…
गेली तीस वर्षे मी तुमच्यासाठी झटतोय. पहाटेपासून कामाला सुरुवात करतोय. पक्षात गटतट आहेत. मात्र मागे काय झाले ते विसरा. एकमेकांवर गैरविश्वास ठेवू नका. शेवटच्या मतदारपर्यंत पोहचा. किमान माझ्यासाठी तरी गटतट विसरा असे आवाहन अजितदादांनी कार्यकर्त्यांना केले.
COMMENTS