सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : प्रतिनिधी
निरा बारामती रोडवरील बारामती कॉर्नर चौकामध्ये रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबलेल्या टाटा आयशर टेम्पोला मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने आयशर टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.
कोलम कर्नाटक वरून कापड धागा भरलेला आयशर टेम्पो क्र MH 11 DD 2308 मालेगाव धुळे येथे खाली करण्यास निघाला होता रात्रीचा उशीर झाल्याकारणाने गाडी चालक भरत दत्तात्रय कुंभार रा कलेढोण ता. खटाव जिल्हा सातारा स्वतः मालक यांनी टाटा आयशर टेम्पो विश्रांतीसाठी निरा येथील बारामती कॉर्नर येथे रस्त्याच्या कडेला थांबवला असता पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मोरगाव येथून सातारा कडे निघालेल्या अज्ञात वाहनाने ड्रायव्हर साईडने कडक दिली. ड्रायव्हर गाडीमध्ये झोपलेले असताना त्यांना देखील दुखापत झाली आहे तर यामध्ये आयशर टेम्पोचे ड्रायव्हर साईडने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तशी फिर्याद अज्ञात गाडी व चालक यांच्या विरोधात निरा पोलीस चौकीमध्ये फिर्याद देण्यात आली आहे.
COMMENTS