सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील तब्बल ८९ कामगारांना एकत्रित पगारावर नेमणुका करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
आज दि. ९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत ह्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालक सुनील भगत, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, संग्राम सोरटे, प्रणिता खोमणे, ऋषि गायकवाड, किसन तांबे, हरिभाऊ भोंडवे, तुषार माहुरकर, रणजित मोरे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव व कामगार अधिकारी दीपक निंबाळकर उपस्थित होते. ३१ ऑगस्ट २०२४ ला ज्या कामगारांचा कारखान्यातील कामाचा ७ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. आशा कामगारांना एकत्रित पगारावर कारखान्यात नेमणुका करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.
COMMENTS