सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर ; प्रतिनिधी
भोर येथे तहसीलदार राजेंद्र नजन यांचे अध्यक्षतेखाली दि.१ संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक पार पडली.बैठकीत संजय गांधी निराधार ७६ व श्रावणबाळ योजना २६ अशी एकूण १०२ प्रकरणे मंजूर करणेत आली.
तहसीलदार यांनी तात्काळ बैठक घेवून नागरिकांची प्रकरणे लावून मार्गी लावली.लाभार्थींनी प्रकरणे मंजूर झाल्यानंतर आठ ते पंधरा दिवसांच्या आत नजीकच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडून पासबुक काढावेत.तर फोटोसह तहसील कार्यालय भोर संजय गांधी योजना शाखा भोर येथील नायब तहसीलदार प्रतिभा खाडे, अमोल कोल्लम,श्रद्धा जगदाळे यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले.