सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर-वेल्हा तालुक्याच्या हद्दीवरील कुसगाव ता.भोर येथे सोयाबीन भरडताना सोयाबीन भरडी मशीनच्या एक्सेलमध्ये महिलेचे साडीचा पदर गुतून महिला पूर्णता मशीनमध्ये चिरडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि.२३ रोजी घडली. तरुण महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ( शिंदेवाडी ) रंजना दत्तात्रय गोरे (वय - ३५) रा. कुसगाव ,गोरेवस्ती ता. भोर या घरासमोर सोयाबीन भरण्याकरिता गेल्या असताना सोयाबीन मशीन चालू झाल्यानंतर रंजना यांचा साडीचा पदर भरडी मशीन मध्ये गुंतला. यावेळी रंजना यांना भरडी मशीनमध्ये ओढले गेले असताना त्यांच्या शरीराला मोठमोठ्या गंभीर जखमा झाल्या होत्या.रंजना यांना मशीनमधून बाहेर काढून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी महिला रंजना गोरे यांना मृत घोषित केले पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.