सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
जुबिलियंट भारतीय फाउंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र निरा, व महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भरवलेल्या महिलांच्या विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन इंग्लिश मीडियम स्कूल निरा येथे करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन निरा. सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे व जुबिलियंट चे अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष करून महिलांसाठी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये 123 महिलांनी सहभाग नोंदवला. महिला आरोग्य शिबिर भरवण्याचा मुख्य उद्देश महिलांची आरोग्याची जागरूकता वाढवणे, व आरोग्याची तपासणी करून त्याबाबत मार्गदर्शन करणे हा होता. या शिबिरामध्ये हिमोग्लोबिन चाचणी, मधुमेह चाचणी, स्तन कर्करोग पूर्व चाचणी तसेच गर्भाशय कर्करोग पूर्व चाचणी करण्यात आली.
यावेळी जुबिलियंट भारतीय फाउंडेशनचे राजेंद्र जाधव, मुकेश सिंग,निशिकांत नातू, इसाक मुजावर, सूर्यकांत पाटील, युवराज काळे, डॉ. सोनल हेंद्रे, अजय ढगे, सायली फुडे, सलोनी वरुणकर, संगीता जाधव, निरा ग्रामपंचायत राधा माने यांच्या सहकार्याने शिबिर संपन्न झाले या शिबिरास मासूम संस्था यांचे सहकार्य लाभले यावेळी निरा येथील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.