पुरंदर l पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी विलास बडदे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी विलास  बडदे  व व्हाईस चेअरमनपदी  प्रज्ञा चव्हाण  यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
    निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हर्षाली अभिजीत पाटील  यांनी कामकाज पाहिले. या वेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन घटना दुरुस्तीचे अध्यक्ष व संचालक  अनिल कुंभार , पुणे जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे अध्यक्ष  अमोल घोळवे, पुणे जिल्हा ग्रामसेवक सह पतसंस्थेचे चेअरमन प्रदीप खिलारी , मावळते सचिव  पद्माकर डोंबाळे, सरचिटणीस  अनिल बगाटे, कार्याध्यक्ष व संचालक  संदीप ठवाळ, कोषाध्यक्ष व संचालक  संतोष भोसले, खजिनदार  अलका राहणे ,  निलिमा जाधव ,महिला संघटक  अस्मिता चव्हाण , संघटक / संचालक  शरद ढोले, संचालक  देवदत्त सांडभोर, संचालक  विठ्ठल साकोरे, मिलिंद काळे, माजी चेअरमन वसंत खेसे,  धनाजी कादबाने, आकाश सावंत, रमेश राऊत,  नवनाथ झोळ, माजी सेक्रेटरी खळदकर भाऊसाहेब, पुरंदर तालुका सचिव राजेंद्र खंडाळे,  शरद बिनवडे, शशांक सावंत, गोरोबा वडवले,  सुरेश जगताप व इतर ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
    विलास बडदे व व प्रज्ञा चव्हाण यांच्या निवडीबद्दल पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था व पुणे जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. 

To Top