सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या पुरंदर तालुक्याच्या अध्यक्षपदी सोनोरी (ता.पुरंदर) येथील रहिवासी बळीराम काळूराम सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली.
पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. बळीराम सोनवणे हे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे खंदे समर्थक असून, गेले अनेक वर्षे ते रिपब्लिकन चळवळीत सक्रिय काम करीत आहेत.यापूर्वी त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या शेतकरी आघाडीचे तालुकाध्यक्ष म्हणून व सासवड शहर अध्यक्ष म्हणून ही प्रभावीपणे काम केले आहे. त्यांची पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या तालूका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने , तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे , जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्ष पुरंदर तालुक्यातील घराघरात पोहोचविण्यासाठी काम करणार आहे असे बोलताना सांगितले.
COMMENTS