Bhor News l संतोष म्हस्के l लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मानाची लक्ष्मी ८० तर झेंडूची शंभरी पार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
दिवाळीत घर आणि अंगण उजळून टाकणाऱ्या पणत्या जशा मांगल्याचे प्रतीक असतात त्याचप्रमाणे घराची स्वच्छता ठेवण्यासाठी लागणाऱ्या केरसुणी लक्ष्मीचे रूप मानले जाते. तर झेंडूच्या फुलांना पूजनासाठी अनन्यसाधारण महत्त्व असल्याने लक्ष्मीपूजनच्या पूर्वसंध्येला भोरच्या बाजारात मानाच्या लक्ष्मीने ८० रुपये तर झेंडूने शंभरी पार केली.
          लक्ष्मीपूजनातील महत्त्वाचा घटक असलेल्या केरसुणीला तसेच झेंडूच्या फुलांना यंदा महागाईची झळ बसली आहे.केरसुणी बनवण्याकरिता लागणारे कारागीर मिळत नसल्याने तसेच झाडांची पाने यांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्याने लक्ष्मीच्या किमती वाढल्या गेल्या आहेत.मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एका केरसुणी मागे ३० रुपयांची वाढ झाल्याचे चित्र आहे.तर मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे झेंडूच्या फुलांचे मळे सडून गेल्याने तर फुलांची आवक कमी असल्याने झेंडूच्या फुलांना १०० ते ११० रुपये प्रति किलो भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.दसऱ्याला हीच झेंडूची फुले एक दिवस अगोदर ८० ते ९० रुपये किलोने विकली जात होती.तर दसऱ्याच्या दिवशी २०० रुपये किलोने नागरिकांना घ्यावी लागली.
----------------
अवकाळीमुळे लाखो रुपयांचे नुकसान
अवकाळी पावसामुळे झेंडूचे मळे त्यांची पूर्णता नासाडी होऊन गेली.तर उरलेल्या फुलांच्या मळ्यामध्ये सध्या तुडतुडे व करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने झेंडूचे उत्पन्न घटले.फुललेल्या मळ्यामध्ये फुले कमी मिळाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असे खानापूर येथील शेतकरी नवनाथ तुनपुरे यांनी सांगितले.
To Top