Phaltan Breaking ! चारचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू : फलटण तालुक्यातील बरड येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
फलटण : प्रतिनिधी
ऐन दिवाळीच्या दिवशी  फलटण पंढरपूर रस्त्यावर बरड गावाच्या हद्दीत चार चाकी गाडीचा भीषण अपघात होऊन तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
           याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, विजापूर (कर्नाटक) हुन पाडेगाव येथील भैरवनाथ ट्रक गॅरेजचे मालक सागर चौरे वय ३४ रा पाडेगाव ता खंडाळा  चालक निलेश शिर्के रा खटाव व भाऊसो जमदाडे रा खेड ता खंडाळा हे तिघेजण  चाकी क्रमांक एच  ५३ ए ०५१४ मधून फलटण कडे येत होते पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास  बरडहून अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर  अज्ञात वाहनाच्या  धडकेत चार चाकी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला यामध्ये  तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला ऐन दिवाळीच्या दिवशी तिघांच्याही मृत्यूमुळे पाडेगाव खटाव व खेड या गावावर शोककळा पसरली आहे हा अपघात नेमका कसा झाला याबाबतचा तपास फलटण ग्रामीणचे पोलीस करीत असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची कारवाई सुरू आहे. 
Tags
To Top