सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी मेळावा घेत शहरातून प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत गुरुवार दि .२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.
बभोर विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संग्राम थोपटे यांची जिल्ह्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जाहीर सभा झाली.संग्राम थोपटे यांनी शिवतीर्थ चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शहरातून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन केले.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अशोकआण्णा मोहोळ म्हणाले आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून भोर विधानसभेचा कायापालट झालेला आहे.विरोधकांनी कितीही आगपाखड केली तरी भोर,वेल्हा,मुळशीतील जनता जनार्दन थोपटेंच्या विकास कामांवर विश्वास ठेवून येणाऱ्या निवडणुकीत संग्राम थोपटे यांना साथ देतील.त्यावेळी काँग्रेस,शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी खासदार सुप्रिया सुळे,काँग्रेसचे देविदास भन्साळी,विदुरा नवले,रामभाऊ ठोंबरे,गुजर,श्रीरंग चव्हाण,शैलेश सोनवणे,मानसिंग धुमाळ,रवींद्र बांदल,पृथ्वीराज थोपटे,रोहन बाठे,शिवसेना तालुकाध्यक्ष हनुमंत कंक,माउली शिंदे,विठ्ठल शिंदे,स्वरूपा थोपटे,सविता दगडे,प्रसाद शिंदे,अनिल सावले,उत्तम थोपटे,लहू शेलार,संदीप नांगरे,गंगाराम मातेरे,विठ्ठल आवाळे,पंढरीनाथ भिलारे,अभिषेक येलगुडे,अंकुश खंडाळे आदींसह शिवसेना उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.