सोमेश्वर रिपोर्टर टीम------
फलटण : प्रतिनिधी
काळज ता. फलटण येथे दि. १४ रोजी अत्यंत निर्दयपणे गावातील लक्ष्मी देवी मंदिरात बसलेल्या नितीन तकदीर मोहिते यांचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला होता.
यामुळे संपूर्ण फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती मात्र लोणंद पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत २४ तासात घटनेचा छडा लावून संशयतांना बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत लोणंद पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, नितीन तकदिर मोहीते व विमल महादेव मोहीते हे दोन्ही कुटुंब शेजारी शेजारी राहणारे असुन दोघांच्या घरामधील जागेच्या कारणावरुन फेब्रुवारी मध्ये मयत नितीन मोहीते व विमल मोहीते यांचा वाद झाला होता. त्यावेळी संशयतांच्या म्हणण्याप्रमाणे मयत नितीन मोहीते याने विमल मोहीते यांना धक्काबुक्की केल्यामुळे त्यांना दवाखान्याला १० हजार रुपये खर्च आला होता. त्यानंतर सदरची भांडणे त्यांनी आपसात मिटींग घेवुन गावपातळीवर मिटवली होती. परंतु विमल मोहीते यांचा मुलगा संशयित दिपक महादेव मोहीते याने त्याचा राग मनात ठेवला होता. त्यातुनच दिपक महादेव मोहीते वय ४७ वर्ष, पत्नी ज्योती दिपक मोहीते वय ४४ वर्षे, मुलगा कृष्णा दिपक मोहीते वय २२ वर्षे तिघे रा. शिवाजीपार्क समर्थनगर नवी सांगवी पुणे मुळ रा. काळज ता. फलटण जि. सातारा यांनी नितीन तकदिर मोहीते याचा खुन करण्याचा कट रचला.
कृष्णा दिपक मोहीते याने पुणे येथील त्याचे मित्र साथीदार यश बबन सोनवणे वय १८ वर्षे रा. मनपा शाळेच्या पाठीमागे सुर्यमंदिराजवळ हडपसर माळवाडी पुणे- विशाल अशोक फडके वय २० रा. नवी सांगवी साई चोक पुणे, ओंकार किशोर खंडाळे वय १८ वर्षे रा. पिंपळे गुरव लक्ष्मीनगर पुणे, ऋषीकेश तिर्थराज सकट वय १९ रा. पिंपळे गुरवलक्ष्मीनगर पुणे, पुणे येथील एक अल्पवयीन बालक व इतर यांनी दि १३ पासुन नितीन मोहीते याचेवर पाळत ठेवली होती. कृष्णा दिपक मोहीते व त्याचे साथीदार यांना नितीन मोहीते याची माहीती मिळत नसल्याने त्यांनी रितेश राजेश मोहीते व काळज येथील अल्पवयीन बालकाची मदत घेवुन नितीन मोहीते याचे हालचालीवर लक्ष ठेवले होते. दि १४ रोजी ५ वाजलेपासून रितेश मोहीते व विधीसंघर्षीत बालक यांनी नितीन मोहीतेच्या हालचाली कृष्णा मोहीते यास फोनवरुन दिल्याने व नितीन मोहीते हा लक्ष्मी देवी मंदीराचे मंडपामध्ये बसला आहे असे सांगीतलेने रात्री ७.४० वाजण्याच्या सुमारास कृष्णा मोहीते याने त्याचे साथीदार विशाल अशोक फडके वय २० रा. नवी सांगवी साई चोक पुणे, ओंकार किशोर खंडाळे वय १९ वर्षे रा. पिंपळे ग्रव लक्ष्मीनगर पुणे, ऋषीकेश तिर्थराज सकट वय १९ रा. पिंपळे गुरव यांनी नितीन तकदिर मोहीते याचा खुन करण्याचा कट रचून हत्या केल्याचे पोलिसांनी उघड केले,
उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग, पो.नि. अरुण देवकर स्थागुशा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली, तपासी अधिकारी सुशिल बी. भोसले, पोउनि शिवाजी आर. काटे, विशाल कदम, सपोफौ. दिलीप येळे, विष्णु धुमाळ, देवेंद्र पाडवी, पोहवा विजय पिसाळ, नितीन भोसले, पोहवा संजय बनकर, सर्जेराव सुळ, संतोष नाळे, रत्नसिंह सोनवलकर, अतुल कुंभार, योगेश कुंभार, धनाजी भिसे, महेश टेकवडे, प्रविण मोरे, राहुल मोरे, शुभांगी धायगुडे, पो.ना. सिदधेश्वर वाघमोडे, पोकॉ. विठठल काळे, केतन लाळगे, सुनिल नामदास, अंकुश कोळेकर, गोविंद आंधळे, अभिजीत घनवट, अमोल जाधव, संजय चव्हाण, जयवंत यादव, मपोकॉ. स्नेहल कापसे, ऋतुजा शिंदे, भारती मदने, अक्षदा अहिवळे, प्रियंका नरुटे, स्थानिक गुन्हे शाखा साताराचे सपोनि रोहीत फणें, पोउनि. परितोष दतीर, पोहवा संतोष सपकाळ, शरद बेवले, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, अमीत सपकाळ, प्रमोद सावंत, अमीत झेंडे, स्वप्नील कुंभार, लक्ष्मण जगधाने, अरुण पाटील, अजित कर्णे, राकेश खांडेके, ओंकार यादव, रोहीत निकम, शिवाजी गुरव, रवि वर्णेकर, सायबर शाखेतील मपोहवा श्रदधा माने, प्रशांत मोरे, ओंकार डुबल, जय गायकवाड, फलटण शहर पोलीस स्टेशनचे सपोनि नितीन शिंदे, पोहवा धापते, सचिन जगतापख अमोल कर्णे, टिके, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर, पोउनि बदने, पोहवा नितीन चतुरे, श्रीनाथ कदम, हणमंत दडस व अविनाश नलवडे (जि.वि.शा.) यांनी महत्वाची कामगीरी केली आहे. वरीलप्रमाणे झालेल्या चांगल्या कामगीरीबाबत मा. पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
COMMENTS