सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील आंबाडखिंड घाटालगत वसलेल्या आंबाडे ता.भोर येथील चंद्रकांत साहेबराव निकम व कमल गणपत खोपडे यांची बंद घरे गुरुवार दि.२४ रोजा पहाटेच्या वेळी फोडली. घरमालक बाहेरगावी असल्याने चोरट्यांनी घरातील किती रक्कमेचा ऐवज चोरून नेला आहे समजू शकले नाही असे सामाजिक कार्यकर्ते पै. शिवाजी खोपडे यांनी सांगितले.
बंद घर फोडलेले घरमालक पुणे,मुंबई येथे राहत असून त्यांना ग्रामस्थांनी घरफोडीचा झालेला प्रकार कळविला आहे.निकम व खोपडे हे घरमालक घटनास्थळी येऊन पाहणी केल्याशिवाय किती रक्कमेचा ऐवज चोरीला गेला आहे हे समजू शकणार नाही.आंबाडेत बंद घर फोडण्याचे प्रकार वर्षभरात चार ते पाच वेळा घडल्या आहेत.या पार्श्वभूमीवर आंबाडे गावात भूरट्या चोरांचा सुळसुळाट असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.पोलीस प्रशासनाने दखल घेऊन भुरट्या चोरांकडून बंद घर फोडण्याचे घडत असलेले प्रकार तात्काळ थांबवावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.