सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे पोलिस ठाणेंतर्गत कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्याचे आवाहन सुपे पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक मनोजकुमार नवसरे यांनी केले आहे.
सुपे पोलिस स्टेशनंतर्गत गावातील पोलिस पाटलांची मिटिंग घेण्यात आली. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या पार्शभुमीवर निवडणुक आयोगाने घालुन दिलेल्या नियमाप्रमाणे आचारसंहितेचा कुठलाही भंग होवु नये. तसेच कायदा सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी सुपे आणि मोरगाव येथे पोलिसांच्या वतीने रुट मार्च घेण्यात आला.
यावेळी सुपे येथील मुख्य पेठेतुन एसटी बसस्थानक पर्यंत पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी आणि बीएसएफचे जवान आदींच्यावतीने रुट मार्च काढण्यात आला.
.....................................