सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांनी शहरातून प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सोमवार दि.२८ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्याकडे दाखल केला.
भोर विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजा रघुनाथराव विद्यालयाच्या प्रांगणात नागरिक एकत्रित येऊन भोर बस स्थानकाजवळील महापुरुषांना अभिवादन करून शहरातून शिवतीर्थ चौपाटीपर्यंत पदयात्रा काढली.तर शिवतीर्थ चौपाटी येथून भोर पोलीस ठाणे मार्गे राजवाडा चौकात पदयात्रेची सांगता करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला.२८ ऑक्टोबर पर्यंत ४० उमेदवारांनी ७८ उमेदवारी अर्ज खरेदी केले असून संग्राम थोपटे,बाळासाहेब चांदेरे ,जीवन कोंडे ,किरण दगडे, लक्ष्मण कुंभार या ५ उमेदवारांकडून ७ अर्ज दाखल झालेची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.यावेळी किरण दगडे पाटील,तानाजीआण्णा दगडे,राहुल दुधाळ, समीर घोडेकर,प्रतिक वायकर,अमर बुदगुडे, रोहन भोसले, आनंदा देशमाने, राजाभाऊ रेणुसे, सचिन कनेरकर,अशोक भागवत,पंकज खुर्द, सुरेश कांबळे आदींसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.