सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार ठरवण्यासाठी गेले आठ दिवस शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच भाजपा यांचे मोठे खलबत्ते सुरू होते.
अखेर महायुतीकडून भोर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली असून शंकर मांडेकरांच्या नावावर शिक्कमोर्तब झाल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे विरुद्ध शंकर मांडेकर अशी लढत होण्याची चित्र स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भोर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर मंगळवार दि. २९ उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.तर महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी गुरुवारी दि.२४ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसमध्ये भोर विधानसभेच्या निवडणुकीसाठी समोरासमोर लढत होणार असल्याने भोर विधानसभेचा आमदार कोण होणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.