सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर-वेल्हा-मुळशीतील नागरिक सुज्ञ आहेत. सुज्ञ नागरिक शंकर मांडेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.नागरिकांनो बूथ लेवलवर काम करा विजय आपला नक्की आहे.अजितदादांची ताकद वाढवण्यासाठी शंकर मांडेकरांच्या मागे उभे राहून बहुतांशी मताधिक्याने मांडेकर यांना निवडून द्या असे प्रतिपादन अजित पवार गट जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर केले.
भोर- राजगड - मुळशी मतदार संघ विधानसभा निवडणूक २०२४ महायुतीकडून शंकर मांडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरच्या मेळाव्यात प्रदीप गारटकर बोलत होते. यावेळी भालचंद्र जगताप,भगवान पासलकर,बाबा कंधारे,राष्ट्रवादी अध्यक्ष अंकुश मोरे,नगरसेवक प्रमोद निम्हण,भोर तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवने, मुळशी अध्यक्ष राजाभाऊ वाघ,गटनेते शांताराम इंगवले,सागर साखरे,निलेश मांडेकर,बाळासाहेब मांडेकर,देशपांडे,कालिदास गोपालघरे,निता नांगरे,सारिका मांडेकर,चंदाताई केदारी,उज्वला मारणे,आदींसह हजारो भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.