Bhor News l रायरीत माकडांच्या कळपाचा धुडगूस : भात पिकांचे नुकसान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
हिरडोस मावळ खोऱ्यातील रायरी ता.भोर येथील हाता तोंडाशी आलेल्या भात पिकांचे माकडांच्या कळपाने हैदोस घातल्याने गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माकडांच्या उपद्रवाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाकडे झालेल्या नुकसानीची मागणी केली आहे. 
          भोर तालुक्यात महत्त्वाचे भात पीक घेतले जानाऱ्या भात पिकावर वर्षभराची उपजीविका केली जाते तर याच पिकावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते.सध्या भात पिके जोमात आली असताना वर्षभरापासून रायरी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या माकडांच्या कळपाने भात पिकाचे नुकसान केले आहे. माकडे भात पिकात शिरुन भाताला आलेल्या लोंब्या खाऊन टाकत आहेत तसेच माकडे पिकात उड्या मारत असल्याने भात जमिनीवर लोळत असल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. येथील शेतकरी वंदना राघू रेणुसे, श्रीकांत रेणुसे, राघु रामचंद्र रेणुसे, किसन देवजी रेणुसे, मारुती भागुजी रेणुसे, देवबा गणपत किंद्रे,  विठोबा धोंडीबा किंद्रे, शिवाजी दगडू किंद्रे तसेच गावातील अनेक शेतकऱ्यांचे प्रत्येकी दहा ते पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.तरी वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करावा तसेच नुकसानीची पाहणी करुन भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
To Top