सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
निरा : प्रतिनिधी
पुणे-पंढरपूर रस्त्यावर लोणंद येथे वर्षभरापूर्वी एसटी बस आणि दुचाकी मध्ये भीषण अपघात झाला होता. यामध्ये पुरंदर तालुक्यातील पिंपरे येथील दुचाकी वरील तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
यामध्ये ओंकार संजय थोपटे, अनिल नामदेव थोपटे, पोपट अर्जुन थोपटे, तिघेही रा. पिंपरे ता. पुरंदर या तिघांचाही मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता.घरातील तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे या तीनही कुटुंबाची मोठी हानी झाली होती. तीनही कुटुंबातील मुलांचे आई वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत, मुख्यमंत्री सहायता निधी, व गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विशेष प्रयत्न करून या तीनही कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली, ही मदत काल त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आली. यावेळी माजी सभापती अतुल मस्के, पिंपरेशाखाप्रमुख प्रशांत थोपटे, रवींद्र गायकवाड, विश्वजीत सोनवणे, स्वप्निल थोपटे, आकाश थोपटे, पंडित शेठ बंडगर, स्वप्निल वंजारी, नीरा शहर रणवीर खरात, यांच्यासह निरा व पिंपरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी नामदार विजय शिवतारे यांचे आभार मानले.
COMMENTS