सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली : धनंजय गोरे
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कायम तत्पर असून ज्यांनी माझ्या साठी काम केलं त्यांच्या अडचणीच्या वेळी रात्री च्यावेळी देखील मी उभा राहणार, ज्यांना काम पाहिजे त्यांना काम ज्यांना ताकद पाहिजे त्या सहकाऱ्यांच्या पाठीशी ताकद उभी करणार आता विधानसभेचा अर्ज भरल्यानंतर चित्र स्पष्ट झालं आहे या विरोधकांच्या कडे बोलण्या सारखे काही नाही महिन्या पूर्वी याच उमेदवारांनी अजितदादा ना जेवायला घातले नंतर पवार साहेब च्याकडे गेले तिथे काही झालं नाही म्हणून आता ठाकरे गटात कडे गेले निवडणुकी नंतर ते पुन्हा अजित दादा कडे जातील जावलीचा स्वाभिमान म्हणतं आज इकडं उद्या तिकडं करत यांनी पद मिळवली स्वतःच्या पदा साठी मतदार यादी तील नाव बदलून गोगावे गावात पुन्हा नाव घालून महाबळेश्वर च सभापती पद भोगले नंतर मेढा येथे नाव नोंदविले आणि शिक्षण सभापती पद घेतले एकदा मेढा एकदा गोगावे असं करत आहे स्वतः च्या फायद्यासाठी जावलीचा स्वाभिमान हे गोंडस नाव यांनी दिले लोकांच्या मधे बुद्धी भेद करायचे काम चाललाय तुम्ही पण सत्तेत होता त्या काळात किती निधी आणला माझं वडील आमदार होते म्हणून मी पण आमदार झालं पाहिजे असं यांचे सद्या चालू आहे कुडाळ येथील दिवाळी फराळ कार्यक्रम प्रसंगी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अमित कदम यांचे नाव न घेता टीका केली
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे प्रतापगड कारखाना चेअरमन सौरभ शिंदे जावली बाजार समिती सभापती जयदीप शिंदे रवी परामणे हणमंतराव पार्टे इंद्रजित भिलारे मच्छिन्द्र मुळीक विरेंद्र शिंदे श्रीहरी गोळे हिंदुराव तरडे, अरुणाताई शिर्के समीर आत्तार यांची यावेळी उपस्थिती होती पुढे बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले आपण गप बसून चालणार नाही जे नाराज आहेत त्याला बरोबर घेऊन काम केलं पाहिजे सगळेच तोला मोलाचे आहेत सगळे आप आपल्या गावात मोठे आहेत माझ्या कडून तुमच्या सर्वांचा मान राखला जाईल कोणीही नाराज होऊ नका पुढील निवडणुका सर्वांनी मिळून लढवायचं आहे कोणाला हि मी डावलणार नाही तुमचे खच्चीकारण होणार नाही तुमचा विश्वास कायम राहावा त्यासाठी मी आपल्या साठी सर्व काही करेन मोठ्या सह छोट्या कार्यकर्त्या सोबत आहे.
COMMENTS