सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : प्रतिनिधी
राजगड तालुक्यांतील वडगाव झांजे, सोंडे कार्ला, सोंडे सरपाला, सोंडे मथाना, सोंडे हिरोजी या गावातील युवक व युवतीं साठी मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे माहिती शिवार फाउंडेशन चे अध्यक्ष गोपाळ इंगुळकर यांनी दिली.
याबाबत इंगुळकर म्हणाले की सध्या महिला वरील अत्याचार वाढत चालले आहेत. रोज वर्तमान पत्रात बातमी वाचायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत मुलींनी व मुलांनी देखील सक्षम असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात अशा प्रशिक्षण ची सोय नाही म्हणून तालुक्यातील वडगाव झांजे, सोंडे कार्ला, सोंडे सरपाला, सोंडे मथाना, सोंडे हिरोजी येथील युवक व युवतींना मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एक महिना हे प्रशिक्षण सुरु राहणार असुन नुकतीच याची सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवार फाउंडेशन चे अध्यक्ष गोपाळ इंगुळकर विकास कांबळे, भरत काटकर,स्वप्निल इंगूळकर, सागर दिक्षित, अजय पुरोहित, उपस्थित होते.
COMMENTS