Baramati News l सोमेश्वरनगरच्या शिक्षकांची सोमेश्वर ते पंढरपूर सायकलवारी : अजित दादांच्या विजयासाठी विठ्ठलाला साकडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर ता. बारामती येथील शिक्षकांनी सोमेश्वरनगर ते पंढरपूर अशी १३० किलोमीटरची सायकलवरून प्रवास करत बारामती विधानसभेचे उमेदवार अजित पवार यांच्या विजयासाठी विठ्ठलाला साकडे घातले. 
      शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमेश्वरनगर येथील प्रा. पवार ए एन, प्रा. कदम आर सी व प्रा. बनकर एस जी यांनी पहाटे साडेचार वाजता सोमेश्वर ते पंढरपूर सायकल वारी सुरू केली व ती साडेअकरा वाजता सात तासात १३० किलोमीटर अंतर पार करून पंढरपूर येथे पोहोचले. जाताना ते फलटण माळशिरस वेळापूर मार्गे पंढरपूरला गेले तिथे जाऊन त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन बारामती विधानससभेचे उमेदवार अजित पवार यांची भरघोस मतांनी बारामती विधानसभा मतदारसंघात निवड होऊन त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी यासाठी विठ्ठलाला साकडे घातले. 
 
To Top