सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली : धनंजय गोरे
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा शिवेंद्रसिंहराजे भोसले सांगतात, त्यांच्या याच वारसाला आपण मावळ्यांच्या रूपाने कामातून सिद्ध होण्याची हीच वेळी असून विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंना सातारा तालुका, शहर यापेक्षा जावली तालुक्यातून मताधिक्य देण्याचा अग्रक्रम असला पाहिजे त्यासाठी सर्वांनी गट तट बाजूला ठेवून काम करण्याचे आवाहन सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी केले.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ सोनगाव ता जावली येथे कुडाळ जिल्हा परिषद गटाचा मेळावा प्रसंगी ज्ञानदेव रांजणे बोलत होते यावेळी प्रतापगड कारखाना चेअरमन सौरभ शिंदे,जावली महाबळेश्वर बाजार समिती सभापती जयदीप शिंदे, हणमंतराव पार्टे, मच्छिन्द्र मुळीक, राजेंद्र शिंदे मच्छिन्द्र क्षीरसागर विरेंद्र शिंदे एकनाथ रोकडे संदीप पवार प्रविण देशमाने संजय निकम यांच्या सह कुडाळ गटातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना ज्ञानदेव रांजणे म्हणाले, प्रत्येकाने आपल्या गावात बूथवर काम करावे जास्तीत जास्त मतदान कसे होईल याचे नियोजन बूथ कमिटीने केले पाहिजे, प्रतापगड कारखाना चेअरमन सौरभ शिंदे म्हणाले,शिवेंद्रराजेंनी जावली तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला तालुक्यातील सहकारी संस्था टिकविण्याचे काम त्यांनी केले, ज्यांनी आज पर्यंत फक्त पक्ष बदलण्याचेच काम केले भाजपा राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार त्यानंतर काही काळ शरद पवार गट आणि आता आमदारकीच्या तिकिटासाठी पुन्हा मशाल हाती घेणारे काय काम करणार अशी खरमरीत टीका अमित कदम यांचे नाव न घेता केली
जावली महाबळेश्वर बाजार समिती सभापती जयदीप शिंदे म्हणाले, कुडाळ गटातील या कार्यक्रमांची गर्दीच येणाऱ्या निकालात कुडाळ गटा तुन मताधिक्य देणार असून विरोधकांनी ही भविष्यात काय होईल हे आताच पहावे शिवेंद्रराजेंनी कुडाळ गटाला विकासकामातून वेगळ्या उंचीवर नेले आहे, जावली तालुक्यातील कुसुंबी म्हसवे जिल्हा परिषद गटापेक्षा जास्त मतदान कुडाळ गटातून झाले पाहिजे आपणच आपल्याशी स्पर्धा करूयात जेणेकरून मोठे मताधिक्य शिवेंद्रराजेंना मिळेल.
यावेळी जावली बाजार संचालक मच्छिन्द्र मुळीक, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदीप पवार आरपीआय तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, वीरेंद्र शिंदे संजय निकम संदीप परामणे बाबा साळेकर यांच्या सह अनेकांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाचे स्वागत बाजार समिती संचालक मच्छिन्द्र मुळीक यांनी तर आभार प्रतापगड कारखाना संचालक नाना पवार यांनी मानले
COMMENTS