सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील जनता स्वाभिमानी असून ती कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही. आपण सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून तालुक्याच्या विकासासाठी एक दिलाने काम करू, असे मत आ.संग्राम थोपटे यांनी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना व्यक्त केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम थोपटे यांनी राजगड तालुक्यातील पासली खोऱ्यातील विविध गावांना भेटी दिल्या.
सकाळी मेंगाई देवीचे दर्शन व आशीर्वाद घेऊन भोर राजगड मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी गाव भेट दौऱ्यास सुरुवात केली.
पासली खोऱ्यासाठी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेतीच्या पाण्यासाठी भोर्डी - वरोती बंधारे बांधण्यात आल्यामुळे १८ गावांना बारमाही शेतीसाठी पाण्याची व्यवस्था होणार आहे.
महाडला जाणाऱ्या भोर्डी - शेवते रस्त्याचे काम पुढील वर्षात पूर्ण असेल. हा रस्ता कमी अंतराचा जवळचा रस्ता असल्याने प्रवाशांची वेळ व इंधन खर्च वाचणार आहे. परिणामी अनेक पर्यटक व प्रवासी या मार्गाचा उपयोग करतील त्यामुळे स्थानिकांच्या छोट्या मोठ्या व्यवसायला चालना मिळणार आहे.
त्याचबरोबर रस्ते, छोटे, मोठे पूल, सामाजिक सभागृह, सभामंडप, शाळा इमारत, ग्रामपंचायत कार्यालय, प्रशासकीय इमारत अशी अनेक कामे मार्गी लावता आली काही सुरू असलेली कामे पुढील काळात पूर्ण होतील.
भविष्यात तालुक्याच्या विकासासाठी एक सुवर्णसंधी यावेळी निर्माण झाली असून यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य नेहमीच असते आणि यापुढेही राहील. कुंबळे ते चांदवणे हा रस्ता वनविभागाच्या हरकतीमुळे प्रलंबित आहे परंतु याबाबत शासन दरबारी याबाबत पाठपुरावा सुरू आहे. भट्टी खिंड रस्ता पावसामुळे खराब झाला होता त्याचे देखील काम सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत.
राजगड तालुक्यातील जनता कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही.आपण सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून तालुक्याच्या विकासासाठी एक दिलाने काम करू, असे मत आ.संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.
यावेळी वेल्हा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासो राऊत, जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव धरपाळे, अमोल नलावडे, राजगड सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका शोभाताई जाधव, संदीप नगीने, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कार्याध्यक्ष रमेश शिंदे, युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे, शिवाजी चोरघे, राजू देशपांडे, मोहन गिरंजे, गणपत आप्पा देवगिरीकर, अण्णा शेंडकर, निलेश पवार, प्रकाश बडे, सागर मळेकर, शंकर रेणुसे, विलास वालगुडे, नंदू घाटे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक यांचसह ग्रामस्थ, महिला तरुण वर्ग उपस्थित होते.