सोमेश्वर रिपोर्टर टीम------
साखरवाडी : प्रतिनिधी
काळज ता फलटण गावामध्ये आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल वरून आलेल्या टोळक्याने गावातील एकाची कोयता व धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहिती अशी, काळज गावातील नितीन तकदीर मोहिते वय ४० हे आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास समाज मंदिरात बसले असताना त्या ठिकाणी मोटर सायकल वरून आलेला अज्ञात युवकांनी कोयता व धारदार शस्त्राने वार केले यामध्ये नितीन मोहिते गंभीर जखमी झाले त्यांना लोणंद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचाराआधीच त्यांचे प्राणजोत मावळली. या घटनेने काळजसह परिसरात खळबळ उडाली असून लोणंद पोलीस स्थानकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.
COMMENTS