सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
रांजणे (ता. राजगड) गावच्या हद्दीत रिक्षाच्या झालेल्या अपघातामध्ये मायलेकाचा मृत्यू झाला असून व विवाहीत मुलगी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवार (ता.१३) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
शालन पासलकर (वय. ६५) दिपक पासलकर (वय. ४५) मुळगाव गिवशी (ता. राजगड) सध्या राहणार दौंड जि. पुणे यांचा अपघातात मृत्यू झाला असून कविता मरळ (वय. ४०) राहणार कानंद (ता. राजगड) या गंभीर जखमी आहेत. कानंदचे पोलीस पाटील संजय कडू यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आई शालन व मुलगा दीपक हे कानंद येथे मुलीकडे गेले होते. तेथून पाबे घाट मार्गे पुण्याकडे जाताना रांजणे गावच्या हद्दीत हा अपघात घडला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात झालेल्या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडल्याने रस्त्यामध्ये मोठे झाड पडले होते पडलेल्या झाडाच्या अलीकडेच रांजणे गावच्या हद्दीत असलेल्या छोट्याशा पुलाच्या कठड्याला रिक्षा धडकून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
आपत्ती व्यवस्थापन ला दिल्यानंतर रेस्क्यू टीमने पडलेले झाड कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. घटनास्थळी मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन टीम मधील सदस्य तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, संजय चोरघे, नीलकंठ लोहकरे, व कैलास दारवटकर यांनी रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस पंचनामा सुरू आहे.
COMMENTS