सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे गेल्या वर्षभरापासून होत असलेल्या चोऱ्यांमुळे येथील नागरिक हवालदिल झाले आहेत. कालच अभिजीत ज्वेलर्स या सराफी पेढीवर मध्यरात्री पडलेल्या दरोड्यामुळे नागरिक चिंताग्रस्त
असतानाच आज दिवसा दुसरी घरफोडी झाली.
त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर व्यापारी वर्गासह महिला वर्गांत मोठ्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निरा येथील वॉर्ड नंबर सहा मधील पालखीतळा शेजारील लक्ष्मी कॉम्प्लेक्स या बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावरील बंद असलेल्या फ्लँटचे कुलूप दिवसा तोडून सुमारे 70 हजार रुपये रोख असा ऐवज चोरीला गेला. अशी फिर्याद मन्सूर रमजान सय्यद वय 50 रा. निरा यांनी निरा पोलीस स्टेशनला दिली आहे.
मन्सूर सय्यद नोकरीनिमित्त व त्यांची पत्नी लेडीज शॉपीचे दुकानानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात. त्यामुळे आपल्या फ्लँटला कुलूप लावून गेले होते. दुपारी दीड वाजता मन्सुर सय्यद हे जेवण करण्यासाठी घरी परत आल्यानंतर पाहिले असता फ्लँटचा दरवाजा उघडा दिसला व आतील कपाट देखील उघडलेले दिसले त्यांनी पाहणी केली असता कपाटातील डब्यामध्ये ठेवलेले 70 हजार रुपये रोख रक्कम लंपास झालेली त्यांना दिसून आली. तशी फिर्याद त्यांनी निरा पोलीस चौकीमध्ये दिली आहे.
याच कॉम्प्लेक्स समोरील पार्किंग मधून आठ महिन्यापूर्वी एक स्प्लेंडर व दोन महिन्यापूर्वी स्विफ्ट गाडी चोरीस गेली होती. वास्तविक निरा येथे कामानिमित्त व रोजगारानिमित्त पर राज्यातील अनेक लोक वास्तव्यास आहेत त्याची नोंद पोलीस दप्तरी होणे गरजेचे असताना घरमालक देखील त्याची नोंद करताना टाळाटाळ करताना दिसत आहेत , गेल्या वर्षभरापासून निरेमध्ये चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे अनेक टू व्हीलर चोरीस गेलेल्या असताना त्याचा तपासही अद्याप चालू असताना आता चोरांचा मोर्चा बंद असलेल्या घरांच्या दरवाजाकडे वळला आहे या लक्ष्मी कॉम्प्लेक्समधील सीसी टीव्ही कॅमेरे काही दिवसां पासून बंद असल्यामुळे याचा तपास करणे देखील पोलिसांसमोर आता मोठे आव्हान उभे राहिलेले दिसत आहे.
COMMENTS