सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
गुन्हेप्रकटीकरण विभाग व वाई पोलिसांनी चोरीस गेलेल्या सुमारे ३ लाख ५० हजारांच्या ५ मोटारसायकल हस्तगत करत वाहनचोरीचे ५ गुन्हे केले उघड केले.
रविवार पेठ वाई येथुन होंडा स्पेल्डर गाडी क्र एमएच ११ एस ४२५४ चोरीस गेलेबाबत वाई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद होता. त्याचप्रमाणे अॅक्टीव्हा गाडी क्र एमएच ११ डीएल ८५८७ ही परशुराम नगर वाई या ठिकाणाहुन चोरीस गेलेबाबत वाई पोलीस ठाणे गु.र.नं २८९/२०२४ प्रमाणे व एमएसईबी कार्यालय वाई समोरुन पिवळ्या रंगाची रेझर स्कुटर गाडी क्र एमएच ११ डीजी १५७७ ही चोरीस गेलेबाबत वाई पोलीस ठाणेस गु.र. नं २९३/२०२४ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. सदर गाड्याची चोरी करणा-या इसमांचे मुसक्या आवळण्यासाठी वाई शहारातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करणे तसेच गोपनीय माहिती प्राप्त करणे व रेकॉर्डवरील इसमांवर लक्ष ठेवण्याच्या सुचना वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांचेकडुन वाई तपासपथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांस प्राप्त झाल्याने वाई गुन्हेप्रकटीकरण शाखेतील अंमलदार हे वाई शहरात गस्त घालत असतांना परखंदी रोड येथे ओढ्याचे कडेला एक संशयित इसम हा विना नंबर प्लेटची गाडी घेऊन फिरतांना दिसल्याने व त्याचा संशय आल्याने त्यास थांबवुन त्याचे ताब्यात असणा-या काळ्या रंगाचे अॅक्टीव्हा गाडीबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश धनराज पिल्ले रा. कोंढावळे ता. वाई जि. सातारा असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे कसुन तपास केला असता, त्याने वाई शहरातुन ५ गाड्या ह्या चोरी केल्याची कबुली दिली.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो. कॉ विशाल शिंदे पो.कॉ राम कोळी, पो. कॉ नितीन कदम, पो. कॉ हेमंत शिंदे, पो. कॉ श्रावण राठोड, पो. कॉ रुपेश जाधव, राम कोळेकर यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अरुण पाटणकर उमेश गहीण, लेंभे हे करीत आहेत.
COMMENTS