सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
लाटे ता. बारामती येथे मद्यधुंद स्कॉर्पिओ चालकाने तब्बल नऊ जणांना धडक दिली असून यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
विशाल जगताप रा. बाजरंगवाडी ता. बारामती असे मद्यधुंद चालकाचे नाव आहे. तो बजरंगवाडी कडून लाटे बाजूकडे चालला होता. दारूच्या नशेत झिंगलेल्या या बेदरकार चालकाने धडक दिल्याने वसंत साहेबराव जाधव, देव चव्हाण, श्री चव्हाण ( ही दोन लहान मुले) तसेच सचिन बबन कदम, गौरी सचिन कदम यांच्यासह अनेक अनेक जणांना उडवले आहे. अपघात करून पळून जाताना जमावाने पकडून चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा तरुण नेहमीच दारूच्या नशेत असतो. यापूर्वी ही त्याने अनेक लोकांना गाडीने उडवले असून त्याच्यावर कडक कारवाई करावी असे अशी लोकांची मागणी आहे.