भोर विधानसभा l संतोष म्हस्के l भोर विधानसभेत संग्राम थोपटेंचीच चर्चा : मताधिक्याने आमदार तर थोपटेच होणार..पारांवर..चौकात थोपटेंच्या विजयाची चर्चा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भौगोलिक दृष्ट्या राज्यात सर्वात मोठा असणाऱ्या भोर विधानसभा मतदारसंघात आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून हजारो कोटींची विकासकामे मार्गी लागली आहेत. भोर, राजगड (वेल्हा), मुळशी तालुक्याचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांच्याशिवाय पर्याय नाही. 
          होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भोर ,वेल्हा, मुळशी तालुक्यातून विक्रमी मताधिक्याने थोपटे विजयी होणार असे गावोगावच्या पारांवर,चौकात चर्चा रंगू लागल्या आहेत. आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून भोर विधानसभेत कधीही झाली नाहीत एवढी विकासकामे मार्गी लागली आहेत. प्रत्येक गावातील समस्या त्यांनी सोडवल्या आहेत. तिन्ही तालुक्याचे हित जोसपण्यासाठी संग्राम थोपटे आमदार हवे आहेत आणि तेच आमदार होणार आहेत असे लहान थोरांकडून बोलले जात आहे.सध्या सुरू असलेल्या गावभेट दौऱ्यात तसेच जनसंवाद यात्रेमध्ये थोपटे यांना जनतेकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.तर इतर राजकीय पक्षातून काँग्रेस पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचे इन्कमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
To Top